महापौर असताना पद मिरवले; निवडणुकीत वसंत बोराटेनां घाबरले

PMC News – : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारांबाबत गुप्तता पाळणाऱ्या भाजपला प्रभाग 2 मध्ये माजी महापौर राहुल जाधव यांच्या सावळ्या गोंधळामुळे सर्वत्र नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड शहराचे महापौर असताना शोभेचे पद म्हणून मिरवले आणि निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वसंत बोराटेंना घाबरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वसंत बोराटेंच्या विरोधात मी निवडणूक लढणार नाही अशा पवित्रात आमदार महेश लांडगे यांनी देखील राहुल जाधव यांना साथ दिली आहे यावरून हे स्पष्ट होत आहे.

नेमके महापौर असताना काय दिवे लावले मोशीकरांना पडलेला प्रश्न

प्रभाग दाेनमधील उमेदवाराचा प्रवर्ग बदलण्यावरून गोंधळ

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन माेशी-बोऱ्हाडेवाडीतील भाजपच्या दोन उमेदवारांच्या प्रवर्ग बदलण्याला राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने आक्षेप घेतला. भाजपचे माजी महापाैर राहुल जाधव यांनी दाेन गटात अर्ज भरल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यांचा ‘ड’ या एकाच गटात अर्ज भरला हाेता. ऐनवेळी भाजपचे निखिल बोऱ्हाडे यांचा ‘क’ गटातील अर्ज ‘ड’ गटात टाकण्यात आला. निवडणूक कार्यालयातील चित्रिकरणही डिलिट झाल्याचे सांगितले जात आहे. दुपारी तीनपर्यंत भाजपचा एकच एबी अर्ज आला हाेता. तीन नंतर एबी अर्ज कसे वाढले. जाधव यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी वसंत बाेराटे, विशाल अहिर यांनी केली. या मागणीसाठी या पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेहरूनगर येथील निवडणूक कार्यालयासमाेर रात्री उशिरापर्यंत ठिय्या मारला हाेता.

भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या आवक जावक क्रमांक नसलेल्या पत्राच्या आधारे प्रवर्ग बदलण्यात आला. शहराध्यांना असा अधिकार नाही. त्यामुळे जाधव यांची उमेदवारी रद्द व्हावी. भाजप उमेदवाराला पराभव दिसू लागला आहे, त्यांच्या पाया खालची वाळू सरकली असून अर्जात बदल केला जात आहे. प्रशासनाचा भाजप दुरूउपयाेग करत आहे. रात्री उशिरा अर्जाची अदलाबदल केल्याची माहिती मिळाली आहे. रात्रीचे सीसीटीव्ही चित्रीकरण अधिकाऱ्यांनी अद्याप दिले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांनी केला.

पाच उमेदवारांचे एबी अर्ज तीननंतर आले हाेते. त्यामुळे ते अर्ज स्वीकारले नाहीत. या उमेदवारांना पक्षाचे चिन्ह मिळणार नाही. प्रभाग दोनमधील उमेदवारांचा गट बदलण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाईल, असे निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.