पुणे- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे आज सकाळी १० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आंतरवाली सराटी ते मुंबई असा त्यांचा मोर्चा निघणार असून यामध्ये मोठ्यासंख्यने राज्यभरातल्या मराठी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना आणखी एक धक्का बसला आहे. मनोज जरांगे यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे मराठा आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वाहतूक नियम पाळण्यासह शांततेत मोर्चा करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत
अंतरवाली सराटी पोलिसांचा तगडा बंदोबस्त –
६ उपविभागीय पोलिस अधिकारी
८ पोलिस निरीक्षक
४० सहाय्यक पोलिस निरीक्षक
२५० पोलिस कर्मचारी
२३० होमगार्ड
२ एसआरपीएफची कंपनी
३ आरएसपी प्लॅटुन बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोन द्वारेनजर असणार
