beed news anoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत (Mumbai Morcha) धडकणार आहे.
या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय.
मनोज जरांगे म्हणाले की, बीडचे मराठे एकत्र येत आहेत. गडबडीने समाजाचे वाटोळं होत आहे. आता पुढचा काळ लढायचा आहे. समाजाला आवाहन आहे की, आपली ताकद मोठी आहे. आता विचार करून पुढे लढायचे आहे. बीडचे रूप पाहून सरकार बेजार होईल. 29 तारखेला चलो मुंबई… आपल्याला शांततेत जायचं आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला.
यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईत आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही असेही त्यांनी सांगितले.
जरांगे पाटलांचे संपूर्ण भाषण लाईव्ह
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्याअगोदर त्यांनी बीडमध्ये एका संभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही असा इशाराही दिला.
यावेळे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २९ जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या. त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिलं. पण, मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. सगेसोय-यांची अंमलबजावणी केली जात नाही. ही पोटदुखी कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला.
