मनोज जरांगेच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल? कुठे मुक्काम असणार?

सोबत 15 ते 20 दिवस पुरेल एवढे राशन त्यांनी सोबत घेतलं आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार यावेळी मराठा बांधवांनी केला आहे. ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

ओबीसींचा हाके, वाघमारे आणि गुणरत्न सदावर्तेंवर आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणत हाके कमिशन साठी हे सगळं करतोय असा आरोप एका ओबीसी बांधवांनी केला आहे. नांदेडच्या शेलगाव येथील मराठा बांधव प्रचंड आक्रमक झाले असून ते अंतरवाली सराटी मार्गे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हाके, वाघमारे, व गुणरत्न सदावर्ते हे कुत्रे आहेत त्यांना भकू द्या असं म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढाईत सहभाग नोंदवला आहे.

शहागडमध्ये भव्य स्वागताची तयारी

अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते शहागड येथे दाखल होणार आहेत‌. दरम्यान शहागड मध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेन उभा करण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. हजारो मराठा बांधव शहागड मध्ये दाखल झाले आहेत यानंतर ते शहागड मधून पैठण आणि पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.