मराठ्यांचे वादळ मुंबई धडकणार धायरी बैठकीच्या आयोजन

Share

धायरी प्रतिनिधी (ऋषी मुळीक) मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत दिलेल्या वचनांचे पालन करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० एप्रिल रोजी जाहीर केल्याप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

या पार्श्वभूमीवर गावोगावी मराठा समाजाकडून मोर्चाची जय्य्त तयारी सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे,

आज धायरी येथील सावित्री गार्डन येथे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज बांधवांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून धायरी परिसरात स्थायिक असलेले बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, संभाजीनगर, परभणी, नांदेड, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांच्या वतीने उपस्थितांना काही सूचना देण्यात आल्या, आपली मुले आपली संपत्ती आहे. त्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे नेत्यांची हाजी हाजी करणे सोडून मुलांच्या शिक्षण, नोकरी याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे

या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला येण्याचं आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान मोर्चाच्या काळात गणेश उत्सव असल्याने गणपतीची स्थापना चालत्या वाहनांमध्ये करून गणेशाचं विसर्जन समुद्रात करणार पण मोर्चाला येणार असल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *