पिंपळे सौदागर येथील हॉटेल पंजाबला भीषण आग

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी घेतली धाव; प्रशासनाला केल्या सूचना

Pcmc News – पिंपळे सौदागर येथील सुप्रसिद्ध हॉटेल रंगला पंजाब हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भास्मसात झाल्याची घटना दुपारी घडली, शॉर्ट सर्किटने हॉटेलला आग लागल्याची शक्यता वर्तविली जात होती.

या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी तातडीने हॉटेलकडे धाव घेतली व अग्निशामक प्रशासनाशी चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते,

आग विझवायला सुरवात झाली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते, अग्निशामक दल व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी देखील आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले