महिलांनी आर्थिक सक्षम होणे काळाची गरज : रूपालीताई चाकणकर

Share

बाणेर प्रतिनिधी (Rupali chaknakar) सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ,’ असे स्पष्ट मत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी वामा वुमन्स क्लब उत्सव नारीशक्तीचा या कार्यक्रमात मांडले.

या कार्यक्रमाचे आयोजन वामा वुमन्स क्लबचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्याध्यक्ष पुनम विशाल विधाते यांनी आयोजन केले होते,

यावेळी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर, अभिनेत्री अमृता सुभाष व अभिनेता प्रथमेश परब, माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका सुषमाताई निम्हण, ज्योतीताई राहुलदादा बालवडकर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्ष पुनम विधाते म्हणाल्या
महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देऊन खऱ्या अर्थाने सक्षम बनवले आहे, या वेळी त्यांनी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. ‘आपल्यातील क्षमता सिद्ध करणे हेच खरे नेतृत्व असून, केवळ आरक्षणामुळे नव्हे तर आपल्या अंगभूत गुणवत्तेमुळे आपण पुढे येतो, हे प्रत्येक महिलेला दाखवून द्यावे लागेल,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *