महेशदादा नेमकं काय साध्य केलं; ओपनच्या जागेवर ओबीसी उमेदवार दिला

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप विरोधी वातावरण

मराठा समाजाविषयी गरळ ओकणाऱ्या लक्ष्मण हाके यावर काही बोलणार का? सोशल मीडियावर मोठी चर्चा

पिंपरी प्रतिनिधी – : पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला नगण्य स्थान दिले आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मिळून ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता.

मात्र पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले हक्काच्या ओपनच्या जागेवर आमदार लांडगे यांनी ओबीसी उमेदवार दिल्याने याबाबतीत लक्ष्मण हाके ओपनवर झालेल्या अन्यायावर बोलणार आहेत का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रभागातून योगिता नागरगोजे यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आली.

मात्र प्रभागातील जनतेचा वेगळाच कल पाहायला मिळतो यावेळी आमच्या प्रतिनिधीने भारतीय जनता पक्षाच्या या भागातील ज्येष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी नाव न सांगण्याच्या अटीवर उमेदवारी कशी जाहीर झाली हे सांगू शकतो यावेळी ते म्हणाले योगिता नागरगोजे यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात येणार होती कारण त्या सर्वे मध्ये कुठे दिसत नव्हत्या मात्र आमदार महेशदादा लांडगे यांना देखील वरिष्ठांकडून सांगण्यात आल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीच उमेदवारी द्यायला भाग पाडवली व हक्काची ओपनची जागा ओबीसीला गेली मराठा समाजाविषयी गरळ ओळखणाऱ्या लक्ष्मण हाके यावर काही बोलणार आहेत का असे देखील या प्रभागात मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून येत आहेत.