महेश मांजरेकरांनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या भेटीचा किस्सा; म्हणाले

Pune News मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळींचे राजकीय व्यक्तींबरोबर चांगले हितसंबंध असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महेश मांजरेकरांनी वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा खास किस्सा महेश मांजरेकरांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. महेश माजरेकरांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या निमित्ताने महेश मांजरेकर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशातच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी त्यांचा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.

या मुलाखतीत महेश मांजरेकरांना त्यांच्या आवडत्या राजकीय व्यक्ती विचारण्यात आल्या. यावेळी महेश मांजरेकरांनी आवडत्या व्यक्तींची नावं घेत उद्धव ठाकरेंबद्दलही प्रतिक्रिया दिली. महेश मांजरेकर सांगतात, “कोणताच माणूस वाईट नसतो. कुणाचं राजकीय मत वगैरे असेल तर ते ठीक आहे, पण मी त्यात जात नाही. माझ्या मुलीनं ‘मेजर’ नावाचा सिनेमा केला होता, जो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित होता. त्या सिनेमात माझी मुलगी आणि तेलुगू एक नायक होता; तर त्या नायकानं माझ्या मुलीला सांगितलं की, तुझ्या बाबांना सांग मला उद्धव ठाकरे यांना भेटायचं आहे आणि माझ्या मुलीनं ते मला सांगितलं.”