बाणेर प्रतिनिधी :: ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यानंतर, युनेस्कोने ऐतिहासिक निर्णय घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला.
यानिमित्त राज्यभरात याचा जल्लोष सुरु केला असून आज सुसगाव येथील अखिल सुसगाव शिवजयंती उत्सव समिती व गावकरी यांच्या वतीने एकमेकांना पेढे भरवत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला.
यावेळी सुस गावातील गावकरी तरुण कार्यकर्ते मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते