महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा अपघात, पायाला किरकोळ दुखापत;

Pune महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात सिकंदर शेख जखमी झाला असून बक्षीस मिळालेल्या गाडीचा अपघातस्थळी चक्काचूर झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे नागपूर रत्नागिरी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख हा कामानिमित्त सोलापूरला जात होता. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे आल्यानंतर बाजूला असणाऱ्या साईड दुभाजकाला गाडी धडकल्याची माहिती आहे.

झालेल्या अपघातात गाडीचा पुढील भाग हा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, सिकंदर शेख याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. सदरच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेख याच्यासोबत आणखी कोण होते ? याची माहिती मात्र समजू शकली नाही.