महापालिकेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; मंत्री मोहोळांचे पुतणे दु्ष्यंत मोहोळांना युवा मोर्चाची धुरा

पुणे महापालिकेसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी (Pune Politics) सुरू केली आहे. शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यानंतर धीरज घाटे शहर कार्यकारिणीत कुणाला संधी देणार याची चर्चा होती.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे (Muralidhar Mohol) पुतणे दुष्यंत मोहोळ यांची भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी अशी

पुणे शहर सरचिटणीस

पुनीत जोशी, रविंद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे

पुणे शहर उपाध्यक्ष

शशीधर पुरम, सचिन मोरे, अर्जुन जगताप, संदीप दळवी, विठ्ठल बराटे, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिटे

पुणे शहर चिटणीस

राजू परदेशी, अनिल नवले, गणेश घुले, समीर रुपदे, अनुराधा एडके, संगिता गवळी, स्मिता खेडेकर, रुपाली धाडवे

पुणे शहर युवा मोर्चा

दुष्यंत मोहोळ

महिला सहमोर्चा अध्यक्ष

मनिषा लडकत