महादेववाडी उंड्री पिसोळीत स्नेहलताई दगडे यांच्या उमेदवारीमुळे अनेकांच्या अडचणी वाढणार

हडपसर प्रतिनिधी -: पुणे महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या प्रभाग रचना जाहीर झाल्या या प्रभाग रचनेमुळे सर्वच पक्षातील इच्छुक आपापल्या परीने कामाला लागलेले दिसून येत आहेत.

पुणे शहरातील प्रारुप प्रभाग रचनेत मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेते मोठे बदल करण्यात आले आहे.

प्रभाग क्र. 41- महादेववाडी-उंड्री सातव नगर-हांडेवाडी रोड- महादेव वाडी-तरवडे वस्ती- चिंतामणी नगर- उद्योगनगर-कृष्णानगर- जाधवमळा- वाडकरमळा – ससाणे वस्ती – पिसोळी गाव – येवलेवाडी- वडाचीवाडी-औताडवाडी-होळकरवाडी- हांडेवाडी साठेनगर – काळेबोराटेनगर – म्हसोबा नगर सय्यद नगर — हेवन पार्क प्रभाग क्रमांक 41 मध्ये हे गावे जोडले गेले आहेत प्रामुख्याने या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये खरी टक्कर पाहायला मिळणार आहे, त्याचपाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे देखील ताकत पाहायला मिळते.

मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत स्वर्गीय गणपत दगडे यांच्या पत्नी तथा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल दगडे यांच्या उमेदवारीमुळे अनेकांचे महापालिकेत जाण्याचे स्वप्न थांबणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दगडे कुटुंबाची पिसोळी ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्ष एक हाती सत्ता होती स्वर्गीय गणपत दगडे यांना मानणारा मोठा वर्ग हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये तथा प्रामुख्याने उंड्री पिसोळी हांडेवाडी होरकळवाडी वडाचीवाडी महादेव वाडी सय्यद नगर या भागात पाहायला मिळतो, त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना याचा मोठा लाभ होईल असे देखील बोलले जात आहे.

स्नेहलताई दगडे यांच्या उमेदवारीमुळे त्यांचा पॅनल देखील तगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्नेहल दगडे यांना देखील भारतीय जनता पार्टी वेळोवेळी प्रचंड ताकद देताना यापूर्वी देखील पाहिला आहे.

त्यामुळे महापालिकेत जर सत्ता भारतीय जनता पार्टीची आली तर दगडे यांचा विचार मोठ्या पदासाठी होऊ शकतो अशी देखील चर्चा सोसायटी वर्गात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.