Local Body Election नगरपालिका- नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरलाच – सुप्रीम कोर्ट

Pune update News – निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.