लहू बालवडकर,सौरभ कोकाटे, शिवम बालवडकरनां संधी नाहीच;
माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांचा देखील पत्ता कट
भाजपाला नाराजीचा फटका बसणार एक निष्ठेने काम केले परंतु फळ मिळाले नाही परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा
पुणे प्रतिनिधी -: पुणे (Pune) महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Election) 2026 च्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना अद्याप सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पुण्यातील काही हायप्रोफाइल प्रभागांमध्ये कोणाला तिकीट मिळणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 बाणेर सुस पाषाण माळुंगे येथील लढाई मात्र असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून तब्बल 16 नेत्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे या 16 पैकी 12 जण हे मूळ भाजपमधील नेत्यांची मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपवर घराणेशाहीचा शिक्का बसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाकडून अमोल बालवडकर गणेश कळमकर राहुल कोकाटे रोहिणी चिमटे यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टी कडून फायनल झाली आहे;
नवीन चेहऱ्यांना डिच्छू; प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी नाही
यावेळी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनेक दिग्गज इच्छुक होते यामध्ये लहू बालवडकर यांना पक्ष संधी देईल असे वाटत असताना त्यांचा पत्ता देखील कट केला आहे; गेल्या निवडणुकी वेळी त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता.
दिग्गज इच्छुकांचा पत्ता कट
प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, विशाल गांधिले, लहू बालवडकर, प्रियांका शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, उमा गाडगीळ, सचिन पाषाणकर, सुभाष भोळ, स्नेहल महाडिक, धनश्री भोते, नारायण चांदेरे, प्रियांका चिव्हे, संतोष तापकीर, शिवम बालवडकर आधी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
