मुंबई प्रतिनिधी :: चांदणी चौक ते खेड शिवापुर टोल नाका या राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडले होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले त्यामुळे वाढती वसाहत म्हणून या भागाकडे पाहिले जाते,
मात्र या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून संध गतीने सुरू आहे, रस्त्याला सर्व खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे, जाणीवपूर्वक संध गतीने काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करा असा प्रश्न भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
ठेकेदारावर कोण मेहेरबान?
खेड शिवापूर उड्डाणपूल करणार्या ठेकेदाराने संथगतीने काम करून उड्डाणपूल सुरू केला; मात्र तीनच महिन्यांत उड्डाणपुलावर खड्डे पडले होते, यावरून कामाची योग्यता स्पष्ट होत आहे. त्यातच सेवा रस्त्याचे काम तब्बल तीन महिने बंद असून याचा नाहक त्रास विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना होत असून याची दखल घेतली जात नाही. ठेकेदारावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेहेरबान आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
30 मीटर उड्डाणपूल चोरीला गेल्याची चर्चा
खेड शिवापूर उड्डाणपुलाची लांबी जेवढी पाहिजे त्यापेक्षा 30 मीटरने कमी केली गेली आहे, अशी चर्चा या भागात सुरू आहे. यामुळे शिवगंगा खोर्यातील नागरिकांमध्ये खेड शिवापूर येथील 30 मीटर उड्डाणपूल चोरीला गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.