पुणे प्रतिनिधी ::- केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित सर्व समस्या, मागण्या, योजनांचे मार्गदर्शन आणि तात्काळ सेवा मिळाव्यात यासाठी शहरात एक 24×7 सुरु असणारे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे संगणकीकृत नागरी सेवा कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी बागेसमोर सुरू करण्यात आले आहे.नागरिक केंद्रबिंदू ठेवून आखलेली ही संकल्पना नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार १२ जुलै दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पुणेकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ यांना राजधानी दिल्लीत पाठवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रायलाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.पुणेकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ यांना राजधानी दिल्लीत पाठवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रायलाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. मंत्री म्हणून काम करतानाही खासदार मोहोळ यांनी विधानसभानिहाय जनता दरबाराव्दारे पुणेकरांशी संवाद ठेवला. पुणेकरांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्याशी कायम संवाद राखण्यासाठी आता शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तास खुले असणारे खासदार जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या या कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी ( दि.१२) होणार आहे. .या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन होणार आहे