खडकवासल्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार; नितीन वाघ राजीनामा देण्याच्या तयारीत

पुणे प्रतिनिधी -: राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर खडकवासला शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष नितीनदादा वाघ आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या जिल्हा परिषदेच्या वेळी केवळ 600 मतांनी त्यांचा डोणजे जिल्हा परिषद गटात पराजय झाला होता.

यावेळी ते प्रबळ इच्छुक असताना ठाकरे शिवसेनेने त्यांना डावल्य असल्याच्या बातम्या येत आहेत.

आमच्या प्रतिनिधीने त्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र ते लवकरच आपल्या पदाधिकाऱ्यांसमोरच आपला राजीनामा देणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून येत आहे