बाणेर प्रतिनिधी :: हिंजवडी आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा आणि जलद गतीने कशी करता येईल, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यासाठी काही नवीन रस्ते प्रस्तावित तसेच रुंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रशासकीय यंत्रणांना दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी सहा वाजताच हिंजवडी आयटी पार्कची पाहणी सुरू केली. यामुळे शासकीय यंत्रांची धावपळ उडाली.
स्थानिक नेत्यांच्या आधी मुख्य नेते अजितदादा पोहोचले
रविवार म्हटलं की निवांत लेट उठायचा कार्यक्रम हा संपूर्ण शहरी भागात प्रामुख्याने होतो, मात्र आज वेगळाच अनुभव आला,
अजितदादा हे काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात सकाळी माहिती मिळाल्यानंतर आज पहाटे ५ वाजता उठलो नित्यक्रम झाला मात्र अजित दादा एवढ्या लवकर येतील असे कधीच वाटले नाही, अधिकाऱ्यांबरोबर स्थानिक नेत्यांची झोपेबरोबर धांदल देखील उडाली होती व सर्वांच्या प्रथम ६ वाजता अजित दादा हे हिंजवडी आयटी पार्क मध्ये पोहोचले.
पोचल्याबरोबर कोणाचीही वाट न पाहता त्यांनी हिंजवडी मान राजीव गांधी आयटी पार्क येथील विविध समस्याची पाहणी केली त्यावेळी पुणे प्रशासनाचे व पिंपरी चिंचवड प्रशासनाचे सर्वच अधिकारी उपस्थित होते त्यांना जागेवर सूचना केल्या व काम लवकर मार्गी लावण्यासाठी डेडलाईन दिल्या.
यावेळी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासन व अनेक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
आमच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांना नेत्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे हे आजच्या दौऱ्यात समजले टाईम मॅनेजमेंट कसा केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित दादा पवार होय, प्रशासनाबरोबर उत्तम रीतीने काम करण्याची त्यांची स्टाईल व छबी मी आज जवळून पाहिली वेळेचे महत्व किती असले पाहिजे याचा सुद्धा अंदाज मला आज आला भल्या पहाटे उठून काम करणारा नेता महाराष्ट्रात तरी मला अजितदादा सोडून दुसरा दिसत नाही असे प्रतिपादन पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले आहे.