कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! EPFO ने घेतला मोठा निर्णय होणार मोठा फायदा

Pune कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी किमान सहा महिने सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळत होता.

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडली असेल, तर सर्वप्रथम तुमच्या पीएफ पासबुकची तपासणी करा. जर त्यात पेन्शनसाठीची रक्कम जमा झालेली दिसत नसेल, तर 2024 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तुम्ही ईपीएफओ कार्यालयात तक्रार करू शकता.

नोकरीच्या कालावधीत नियोक्ता आणि कर्मचारी दोघे मिळून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा करतात. या पैशातील काही भाग कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जमा केला जातो. त्यामुळे आता अल्पकालीन नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. (EPFO Rule Change)

ईपीएफओ फक्त बचत सुरक्षित ठेवत नाही, तर त्यावर दरवर्षी व्याजही देते. आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओने 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला असून ही रक्कम आता खातेधारकांच्या खात्यात जमा केली जात आहे. नोकरदारांसाठी ही योजना निवृत्तीनंतरचा मोठा आर्थिक आधार ठरते.