JEE (Mains) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सत्कार

Share

JEE (Mains) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सत्कार.

JEE (Mains) परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या कु.सुबोध भगवान भोसले व कु.वेदांत भगवान भोसले या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनावरील माहिती पुस्तिका देऊन भाजपा शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु.सुबोध भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परीक्षेत 99.64% (AIR 5580) मिळवून IIT बेंगलोर या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तसेच कु.वेदांत भगवान भोसले यांनी JEE (Mains) या परिषद 99.68%(AIR 4959) व JEE (Advanced) परीक्षेत (AIR 5347) मिळवून IIT हैद्राबाद या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला .

या विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास, सातत्य व आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे श्री.शत्रुघ्न काटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित पालक व स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *