Jaysingh Mohite Patil भाजप (BJP) उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती. अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेही गेले होते.
मात्र आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही हे मी सांगून आलो होतो. निवडणुकीला चार दिवस उरले असताना ही ऑफर 50 कोटी रुपयांपर्यंत गेली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील (Jaysingh Mohite Patil) यांनी अकलूज (Akluj) प्रचाराच्या सांगता सभेत केला. अकलूज येथील विजय चौकात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रचाराची विराट सांगता सभा झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आमदार उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख आणि उभाठाचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते. यावेळी जानकर यांना निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण ती ऑफर धुडकावली, पण शब्द मोडला नाही. असे मोहिते पाटील यांनी सांगितले.
