बाणेर प्रतिनिधी (Pune news) औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अभिमानश्री रस्ता, वेस्टएंड मॉल, भाले चौक परिसरात अनधिकृत कच्चे शेड, फ्रंट व साइड मार्जिनवर झालेल्या अतिक्रमणांवर अतिक्रमणविरोधी विभागामार्फत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे व महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन, सहायक निरीक्षक राहुल डोके, वैभव जगताप, हाशम पटेल व पंकज आवाड यांच्या पथकाने केली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही नियमितपणे आणि ठोसपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन यांनी दिली.