औंध प्रतिनिधी (Business organisation) पुणे शहरातील नामांकित अशा औंध व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी नाना गोपीनाथ वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी सचिन दिनकर निवंगुणे, राष्ट्रीय व्यापारी कोर कमिटी, संदीप राठोड, संतोष भाटेवरा, आशिष राठोड, मनीष सोनिगरा, सुरेश चौधरी, नितीन खोंड तसेच मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
श्री नाना गोपीनाथ वाळके हे सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांचे प्रश्न सांभाळत आले आहेत, औंध व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी व व्यापारी वर्गांनी आनंद व्यक्त केला.