हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय; लवासा प्रकरणी शरद पवारांना

pune लवासा हिल स्टेशन प्रकल्पाला दिलेल्या कथित बेकायदेशीर परवानगी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंडा यांच्या खंडपीठासमोर दीर्घ सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सर्व बाजू तपासून पाहिल्यानंतर आज आपला निकाल दिला. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. केवळ आरोपांच्या आधारे सीबीआय चौकशीचे आदेश देता येणार नाहीत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत ही याचिका फेटाळली.

ठोस पुराव्यांच्या अभावामुळे ही याचिका फेटाळण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. या निकालामुळे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरील संभाव्य कायदेशीर कारवाईचा धोका टळला असून, पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. Lavasa Project |