आई – वडील हेच आपले विश्व वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानाचे मोशीत आयोजन

Share

पिंपरी प्रतिनिधी (Vasant Hankare Sir Nikhil borade Birthday speech) आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा असे आपल्या व्याख्यानातून समाज प्रबोधन करणारे प्राध्यापक वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानाचे आयोजन मोशीत करण्यात आले आहे.

न समजलेले आईबाप या विषयावर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निखिलदादा बोऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानाचे आयोजन 5 ऑगस्ट 2025 रोजी युवा नेते निखिल बोऱ्हाडे जनसंपर्क कार्यालयाच्या जवळ केले आहे.

बोऱ्हाडेवस्ती, जाधववाडी,मोशी, चिखली, परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान निखिल बोऱ्हाडे फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *