पुणे प्रतिनिधी -: राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पुणे जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे.
या आदेशामुळे मतमोजणीची तारीख २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, याला “लोकशाहीचा गळा घोटणारा प्रकार” म्हणून संबोधले आहे.
राज्य शासन व निवडणूक आयोग दोघेही यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी आरोप केला की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून, ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. “हे सरकार नेमक्या कोणत्या दिशेने काम करते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निकाल तर फिरवणार नाही ना? केला सवाल उपस्थित
पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की यावेळी पुणे जिल्ह्यातील बहुतांशी जागा काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या आहेत अनेक ठिकाणी रिझल्ट चांगला येण्याची शक्यता आहे मात्र निवडणूक आयोगाच्या या गलथान कारभारामुळे पुन्हा मत चोरीची भीती वाटत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
