Hinjawadi | पतसंस्था ही सामान्यांची अर्थवाहिनी : सुनील चांदेरे

Share

हिंजवडी प्रतिनिधी (Hinjawadi) शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी आर्थिक स्रोत असणाऱ्या पतसंस्था सामान्यांची अर्थवाहिनी आहे, पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असणारी श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था निश्चितच गरजूंच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावेल, असा आशावाद पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी व्यक्त केला.

श्री. समर्थ नागरी पतसंस्थेच्या हिंजवडी येथील आठव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, ही पतसंस्था अतिशय उत्तमपणे व्यवस्थापन मंडळाने चालवली आहे संस्थेच्या ठेवी १४९ कोटी रुपयांच्या आहेत,

कर्ज वाटप देखील मोठ्या प्रमाणावर आहे, या पतसंस्थेचा व्यवसाय अडीचशे कोटीच्या पुढे आहे अशी पतसंस्था उत्तम प्रकारे आपल्या भागात काम करत आहे ही निश्चित आनंदाची बाब आहे.

या उद्घाटनाप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वातीताई हुलावळे, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, युवा नेते, सुरेशभाऊ हुलावळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारी, संभाजीराव गवारी, संतोष शेट गवारी, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके, दिलीप मामा हुलावळे, माजी सरपंच सचिन जांभुळकर, तानाजी हुलावळे, माजी सरपंच नामदेव गोलांडे, मयूर साखरे, वसंतराव बोडके, रामशेठ वाकडकर, समीर बुचडे, घोलप सर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *