Hindustani Bhau on Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठीविरुद्ध हिंदी असा वाद भडकलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकली जावी, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानाला उत्तर भारतीय नेत्यांकडून आव्हान दिलं जातंय. विशेष म्हणजे मराठी बोलता येणारा कलाकार विकास पाठक याने देखील यावेळी हिंदी भाषिकांची बाजू घेतली आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणजे विकास पाठक याने हिंदी भाषिकांची बाजू घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भूमिका मांडणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
Hindustani Bhau on Raj Thackeray हिंदू लोकांना मारणं चुकीचं, हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला!
