Pune Santosh Deshmukh Case : बीड : मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला.
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 9 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता आरोपींना अटक करण्यात आले आहे.
आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराड यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे शुक्रवारी ही सुनावणी अर्धवट राहिली होती आज ही सुनावणी पूर्ण होईल असे वाटते या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही न्यायालयात पोहोचले आहेत.
आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही न्यायव्यतिरिक्त काही बोललेलो नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आरोपी नंबर एकने हायकोर्टात 12 तारखेला बेल एप्लीकेशन दाखल केले होते. त्यासंदर्भात आर्ग्युमेंटचा काही भाग आज कोर्टात होणार आहे. आरोपीचे राज आश्रय घेतलेले समर्थक हे न्यायालय, एसआयटी, मुख्यमंत्री, सीआयडी यांना चॅलेंज करत आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
आरोपींची हत्तीवरून मिरवणूक काढणार
आर्ग्युमेंट होण्याअगोदर आरोपी बाहेर येणार, दहशत माजवणार, आमच्या कुटुंबाला भयभीत करण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आमच्यावर एवढे मोठे दुःख आणि आघात झालेला असताना आम्ही न्यायालय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलो आहोत. आमच्या सर्व गोष्टीवर अजूनही विश्वास आहे आणि आम्हाला अपेक्षा न्यायाची आहे, आमचा माणूस निष्पाप होता आणि न्यायालयाने न्यायालयाने न्याय केला पाहिजे
