नेहमी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एन्जॉयमेंटसाठी लोक पार्टी किंवा इतर समारंभात अल्कोहलचे (Alcohol) सेवन करतात.
सध्याच्या घडीला अल्कोहल सेवन करणे सोशल लाइफचा भाग झाला आहे. मग ती महिला असो की पुरुष प्रत्येकजण आपल्या आवडीखातर किंवा टेन्शनपासून मुक्ततेसाठी दारुचे सेवन करतो.
दारुच्या सेवनावर लोकांचे वेगवेगळे तर्क आहेत, जसे…
दारु पिण्याने चांगली झोप येते,
अल्कोहलच्या सेवनाने शरीर रिलॅक्स होते,
सगळे टेन्शन दूर होते आदि…
दरम्यान, अल्कोहलचे सेवन शरीरासाठी अयोग्य असल्याचे मानले जाते. तरीही रिसर्च आणि स्टडीनुसार जर एका मर्यादित प्रमाणात याचे सेवन केल्यास यामुळे शरीराचे नुकसान होत नाही.
प्रमाणापेक्षा जास्त दारु सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू शकतात. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात, पण एकही न्यूट्रिशन (Nutrition) नसते.
यावर जगभरात मोठ्याप्रमाणात रिसर्च आणि स्टडीज झाले आहेत, ज्यामध्ये एका मर्यादित प्रमाणात अल्कोहलचे सेवन केले जाऊ शकते, असे समोर आले आहे. तर जाणून घेऊयात अल्कोहल किती प्रमाणात घेतले जाऊ शकते.
(मी येथे कोणालाही अल्कोहल सेवन करण्यासाठी भाग पाडत नाही. विविध रिसर्च आणि स्टडीच्या आधारावर ही माहिती देत आहे.)
ब्रेव्हरेज ड्रिंक्सचे मुख्य सायकोअॅक्टिव्ह इन्ग्रिडिएंट इथेनॉल (Ethanol) असते ज्याला अल्कोहल म्हणतात.
जगातील सर्वात सायकोअॅक्टिव्ह सब्सटेन्समध्ये अल्कोहलचाही समावेश आहे. याच्या सेवनाने कोणत्याही व्यक्तीची प्रवृत्ती (Mood) आणि मानसिक स्थिती (Mental State) वर प्रभाव पडतो.
हे अनेक प्रकारचे असतात, जसे…
वाइन (Wine)
बीयर (Beer)
व्हिस्की (Whiskey
व्होडका (Vodka)
रम (Rum)
कॉग्नेक (Cognac)
जिन (Gin)
२. अल्कोहलचे इतके प्रमाण योग्य आहेः डॉक्टर
याबाबत मी जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे (Jaslok Hospital And Research Center) जनरल मेडिसिन कन्सलटंट डॉ. रोहन सेकिरा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, एका स्टँडर्ड ड्रिंकची साइज ३३० एमएल आणि ३० एमएल हार्ड अल्कोहल (व्हिस्की, जिन आदि) आणि १५० एमएल वाइन (रेड आणि व्हाइट) असते.
शरीरात अल्कोहलला डायजेस्ट करण्यासाठी एक एंजाइम असते ज्याला अल्कोहल हायड्रोजन नेट (Alcohol Hydrogen Net) म्हटले जाते. ज्याच्या लिव्हरमध्ये याचे योग्य प्रमाण असते, त्याला काही अडचण नसते. पण ज्याच्या शरीरात याचे प्रमाण कमी असते, त्याला लिव्हरसंबंधित अडचणी लवकर येतात.
त्यांनी सांगितले की, आपले शरीर एका तासात केवळ एक ड्रिंक आणि दिवसभरात एकूण ३ ड्रिंक पचवू शकतो. पण एकाहून अधिक स्टँडर्ड ड्रिंक पिणे नेहमी चुकीचे असते.
मी येथे कोणालाही अल्कोहल सेवन करण्यासाठी भाग पाडत नाही. विविध रिसर्च आणि स्टडीच्या आधारावर ही माहिती देत आहे.)
