शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाला मिळाला तब्बल एवढा भाव

pune news कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाच्या भावात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला जिल्ह्यात कापूस बाजारात तेजी दिसून आली.

येथे आवक आणि रेट दोन्हीही वाढलेत आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र गेल्या काही काळापासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये.

अकोला सीसीआयच्या खरेदी केंद्रावर गुरुवारी 2190 क्विंटल कापूस आवक झाली. या ठिकाणी गुरुवारी कापसाला कमाल 8 हजार 60 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तसेच किमान 7 हजार 738 आणि सरासरी 7 हजार 899 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गुरुवारी कापूस बाजार भावात फार मोठी चढ उतार पाहायला मिळाली नाही.

त्यामुळे येत्या काळात कापसाचे दर आणखी वाढू शकतात अशी अपेक्षा आहे. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात सगळीकडे थंडीचा जोर वाढतोय आणि यामुळे कापूस वेचणीला आणखी वेग येणार आहे.

परिणामी येत्या काळात बाजारांमध्ये कापसाची आवक आणखी वाढू शकते. दरम्यान, कापसाची आवक येत्या काळात वाढली तरी देखील बाजारातील मागणी पण चांगली राहणार आहे.