Pune news राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने डिसेंबर २०२५ महिन्यासाठी प्रमुख पिकांच्या संभाव्य किमतींचा सुधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे.(Shetmal Bajarbhav)
अहवालानुसारए कापूस ७ हजार ११० ते ७ हजार ६१५ रुपये आणि सोयाबीन ४ हजार ५१५ ते ४ हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Shetmal Bajarbhav)
डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या भावांबाबत महत्त्वाचा अंदाज ‘स्मार्ट’ प्रकल्पाने जाहीर केला आहे. राज्यातील बाजारभाव, मागणी-पुरवठा, व्यापारी व्यवहार आणि हवामानातील बदल यांच्या सखोल विश्लेषणातून तयार झालेल्या या अहवालानुसार कापूस ७११० ते ७६१५ रुपये तर सोयाबीन ४५१५ ते ४८८५ रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Shetmal Bajarbhav)
तूर, हरभरा आणि मका या पिकांमध्येही सौम्य वाढ किंवा स्थिरतेची चिन्हे दिसत असून हा अंदाज शेतकऱ्यांच्या विक्री नियोजनाला मोठी दिशा देणारा ठरणार आहे.(Shetmal Bajarbhav)
खानदेशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पण गुलाबी बोंड अळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात आणखी कमी दर कापसाला आहे. वित्तीय फटका कापूस विक्रीसंबंधी बसत असून, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याची स्थिती आहे.
अतिपावसाने यंदा खरीप हंगाम हवा तसा आला नाही. केवळ ४० ते ५० टक्के उत्पादन आले. कडधान्याचे पीक हवे तसे आलेच नाही. कापसाचे उत्पादन घटले आहे. ओळ्या दुष्काळाची स्थिती तयार झाली. त्यामुळे उत्पादन कमी आले, पण कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला.
