विरार प्रतिनिधी :: अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान खरे समाजकार्य म्हणजे ज्याला मदत करायची त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे होय. तुम्ही केलेल्या मदतीचे ओझे, दबलेपण मदत घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसई विरार शहर उपाध्यक्ष सोहेल शेख यांच्या माध्यमातून बेघर रात्र निवारा केंद्रातील गोरगरीब लोकांसाठी सर्व समाजातील गरजू, जेवणाची सोय करण्यात आली व या वृद्धांना रस्त्यावर टाकलेले आहेत तेथून त्यांना आणून त्यांची सोय करण्याचा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक करतात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे यांनी केले यावेळी सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.