माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार

Mumbai Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. तत्कालिन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जाधव यांनी मतदारसंघाचा निकाल फिरवला होता.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘वापसी’ होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाधव यांना घेऊन शुक्रवारी थेट मातोश्री गाठली.

काही दिवसांपूर्वी दानवे हे हर्षवर्धन जाधव यांच्या घरी गेले होते. तिथे या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती. जाधव यांचा संभाव्य पक्षप्रवेश माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्का मानला जात आहे. त्यामुळे खैरेंकडून या प्रवेशाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.