Pune news महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यात भाजपने बाहेरच्या पक्षातील अनेक जणांना घेऊन उमेदवारी दिलीय.
निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झालीय. प्रभाग नऊमधून माजी नगरसेवक व पक्षासाठी झटणारे अमोल बालवडकरांचे (Amol Balwadkar) तिकीट भाजपने (BJP) कापले आहे. त्यांचा जागी दुसरा उमेदवार दिल्यानंतर अमोल बालवडकर हे थेट राष्ट्रवादीत (NCP) दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल बालवडकर यांना बाणेर भागातील प्रभाग नऊमधून उमेदवारी दिलीय.
माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे. तो विश्वास सार्थ ठरवेल, असा विश्वास अमोल बालवडकरांनी व्यक्त करताना भाजपला इशारा दिला आहे. भाजपाची हुकूमशाही चालणार नाही. कुठलाही पक्ष मोठा व्हावा मात्र पाय जमिनीवर ठेवावेत अमोल बालवडकर आता दाखवून देईल की भाजपाला कार्यकर्ता काय असतो, असे इशारा त्यांनी दिलाय. भाजपाला या निवडणुकीत धोबीपछाड देणार आहे. त्यांनी धोका दिला असल्याचे बालवडकरांनी म्हटले आहे.
