कार्यकर्त्यांच्या भावना अनावर; वाटेल तेव्हा घ्या लागेल तेव्हा सोडून द्या आमदार पठारेचीं भूमिका
शिवसेनेचे शांताराम कटके भाजपाच्या सुरेंद्र पठारेनां धोबीपछाड देण्याच्या तयारीत?
हडपसर प्रतिनिधी -: आलिशान गाड्या, तब्बल २७१ कोटींची संपत्ती अन्…; महापालिका निवडणुकीत पुण्यातील ‘या’ आमदारांचे पुत्र सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले ; महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ चे भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.
मात्र शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी महानगरपालिका निवडणुकीत अधिकच चर्चेत आणले मात्र यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळवून येते.
विधानसभेला केले तुतारीचे काम
विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बापूसाहेब पठारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले मात्र त्याच कार्यकर्त्यांना आज पठारे कुटुंबियांनी दोन्ही पक्ष प्रायव्हेट लिमिटेड करत बाजूला केल्याची भावना दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र काकडे यांनी आमदार पठारे यांच्यावर सळसळीत टीका केली यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे घरात सत्ता ठेवून हे कार्यकर्त्यांचा गेम करतात त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार शांताराम बापू कटके यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
शांताराम बापू सारखा कार्यकर्ता महापालिकेत जर गेला तर निश्चित सर्व सामान्य कुटुंबाचे कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे विकासाच्या अनेक योजना ते राबवू शकतात नवीन फळी निर्माण करू शकतात अशा कार्यकर्त्या निश्चित संधी मिळणे पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले
