पुणे प्रतिनिधी :- पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 34 वडगांव खुर्द, वडगांव बुद्रुक (पार्ट), वडगांव धायरी (पार्ट), अभिरुची ढाबा, सणस विद्यालय, रायकरनगर, सनसिटी, गणेश नगर, मधुकोष सोसायटी, राजयोग सोसायटी, दांगट पाटील नगर, व्यंकटेश वृंदावन सोसायटी, सुंदर गार्डन, खाडेवाडी, महादेव नगर, आंबेगाव बुद्रुक (भाग), नऱ्हे गाव, बालाजी नगर, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, झील कॉलेज, जांभूळवाडी तलाव इ या भागातील नागरिकांच्या विकासासाठी पुणे महापालिकेचे नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक रविवारी जनसंवाद चर्चेचे आयोजन केले आहे.
आज वडगाव बुद्रुक येथे १६ जनसंवाद उत्साहात पार पडला यामध्ये नागरिकांनी आपल्या भागाच्या समस्या मांडल्या तात्काळ अधिकाऱ्यांना फोन द्वारे सूचना करत या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत असे आश्वासन देखील नगरसेवक चरवड यांनी दिले.
प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक भागातील समस्या जाणून घेण्यासाठी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
रस्ता पाणी लाईट ड्रेनेज या संदर्भात अनेक नागरिकांच्या अडचणी दिसून आल्या तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वतः पाठपुरवठा करून निश्चित हे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास यावेळी नगरसेवक हरिदास चरवड यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला यावेळी नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
