खडकवासला प्रतिनिधी -: तालुका हवेली तालुक्यातील डोणजे या पुणे शहरालगत गावातील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच सामाजिक बांधिलकी जपत डोणजे गावचे माजी सरपंच स्वर्गीय रोहिदास सदाशिव पारगे यांच्या दुतीय स्मरणार्थ पारगे कुटुंबियांकडून 14 गुंठे जमीन दशक्रिया दशक्रिया घाटासाठी दिली आहे यामुळे डोणजे गावातील दशक्रिया घाटाचा प्रश्न अखेर कायमचा मिटला आहे.
सिंहगडाच्या पायथ्याला वसलेले डोणजे गावाचे राजकारणात, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक कार्यात स्वर्गीय रोहिदास सदाशिव पारगे यांनी आपला वलय कायम ठेवला. नेहमी गावाच्या फायद्यासाठी विकासासाठी ते नेहमीच लढत राहिले त्यामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना अनेक वर्ष निवडून दिले, राजकारणात त्यांनी कायम गावावर तीस-पस्तीस वर्षांपासून पकड घट्ट ठेवली.
आज स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ रोहिदास पारगे यांनी गावच्या दशक्रिया घाटासाठी जमिनीचे दानपत्र ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्त केले.
यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याचे स्वागत करत समाधान व्यक्त केले, स्वर्गीय रोहिदास पारगे यांनी जनसेवेचा वारसा नवनाथ पारगे यांनी कायम जपला आहे यांच्या कार्यदानामुळे गावकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटला आहे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करत आभार व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजाताई पारगे, सरपंच सायली चव्हाण, उपसरपंच शेखर पारगे, ग्रामविकास अधिकारी सतीश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मारुती कंक, ग्रामपंचायत सदस्य सौरभ कांबळे, रोहिणीताई कुंभार, सारिका भगत, आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
