Pune NEWS टिळेकरांना नाराजीचा मोठा फटका बसणार; प्रभागात गुंतून ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी
पुणे प्रतिनिधी -: पुणे महापालिकेत भाजप-शिवसेना युती झाली नसल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. जागा वाटपाचा अखेरपर्यंत राहिलेला तिढा वरिष्ठपातळीवर सुटू शकला नाही. त्यातच भाजपने सर्वच्या सर्व 165 जागांवरील उमेदवार जाहीर केल्याने आता पुण्यात भाजप-शिवसेनेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि ठाकरे सेना, अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र पुणे शहरात खरी लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस होईल असे देखील बोलले जात आहे.
प्रभाग क्र 40 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
विधान परिषदेचे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या स्वतःच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे प्रभाग क्रमांक 40 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वातावरण पाहायला मिळत आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विधानसभा निवडणूक लढवणारे गंगाधर बधे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निवडणूक लढत आहेत; त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका रंजना टिळेकर यांचा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करून गंगाधर बधे, सुरेश कवडे , वर्षा मारकड, सपना धर्मावत, यांचे तगडे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी असणार आहे.
टिळकारांच्या नाराजीचा फटका भाजपाच्या उमेदवारांना बसणार?
देशामध्ये व राज्यामध्ये गल्ली ते दिल्ली सत्ता असताना या भागाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार योगेश टिळेकर यांच्याकडून नागरिकांच्या आपला भाग म्हणून अनेक अपेक्षा होते मात्र त्या प्रमाणात कुठल्याही विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे विरोधकांना प्रचाराला आयते कोलीत मिळालेले आहे.
