धायरीकरांसाठी आनंदाची बातमी मिळणार मोफत ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

धायरी प्रतिनिधी ::- राज्यातील 108 ॲम्बुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे, मात्र शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे खाजगी ॲम्बुलन्स देखील नागरिकांना घ्यावा लागतो,

मात्र खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरीकरांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे धायरीकरांसाठी मोफत ॲम्बुलन्स सोय सामाजिक कार्यकर्ते प्राज भिलारे यांच्या वतीने करण्यात आली आहे,

भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण पार पडला, या कार्यक्रमाला धायरीकरांनी मोठी गर्दी केली होती, यावेळी
राजेशजी पांडे, मा.डॉ.सुजित निलेगावकर सर, मा.दीपकभाऊ नागपुरे, नगरसेवक किशोर पोकळे, बापूसाहेब पोकळे हे उपस्थित होते.