पुणे Dhayari (Pune Update News ) महापालिका निवडणुकासाठी प्रभाग रचनेत धायरीचे दोन तुकडे करून दोन वेगवेगळ्या प्रभागात विभागले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र असे विभाजन करण्यास तीव्र विरोध होत असून धायरीचा एकच प्रभाग ठेवण्याची मागणी होत आहे.
वेळ प्रसंगी लढा देण्याचा निर्धार रविवारच्या बैठकीत करण्यात आला.
धायरी हा स्वतंत्र प्रभाग होऊ शकतो. असे असताना कोणाच्या स्वार्थासाठी असे विभाजन प्रभाग ३३ – शिवणे – खडकवासला व प्रभाग ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक असे करण्यात आले आहे. असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे, विभाजन थांबविले नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे,
विभाजना विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ग्रामपंचायत मधून महापालिकेत गाव समाविष्ट झाले तेव्हापासून आमच्या गावाचा अजून विकास नाही आणि पुन्हा देखील तीच गोष्ट तुम्ही राजकीय फायद्यासाठी करत असाल तर आता लोकांकडूनच विरोध होऊ लागला आहे.
