दीपक मानकरांच्या दोन्ही मुलांसह रूपाली ठोंबरेंना उमेदवारी

Pune News राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, ३० डिसेंबर) हा शेवटचा दिवस आहे. बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म (AB Form) दिले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Pune NCP: रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. प्रभाग क्रमांक २६ मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.