दौंडमध्ये कला केंद्रात अंदाधुंद गोळीबार, सत्ताधारी आमदाराच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Share

भावामुळे सत्ताधारी आमदार अडचणीत? शंकर मांडेकर भोर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,

पुणे प्रतिनिधी (Pune Update) पुण्यातील दौंडजवळच्य कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये भोरचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला होता. त्यामध्ये एक तरूणी जखमी झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याची टीका केली होती. रोहित पवार यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरून स्थानिकांनी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. आज पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शंकर मांडेकर यांच्या भावाचाही समावेश आहे.

दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दौंडमधील कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे होता.

दौंडजवळच्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाला होता. या गोळीबारात रोहित पवार यांनी एक महिला जखमी झाल्याचा दावा केला होता. पण पोलिसांकडून कुणीही जखमी झालेले नाही, असे सांगण्यात आले आहे. कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप या दोघांसह आणखी एका अनोळखी व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी चंद्रकांत मारणे फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दौंडमधील यवत पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *