चिंचवड प्रतिनिधी :: पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, शहरात २५ ठिकाणी भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी केले आहे, त्यांनी शहरातील नागरिकांना आणि युवकांना या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग देण्याचे आवाहन केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वाधिक रक्तदानाचा संकल्प करून पिंपरी चिंचवड शहरातून सर्वाधिक संकलन करण्याचा मानस पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात या ठिकाणी होणार रक्तदान शिबिर
आकुर्डी, निगडी, दिघी, इंद्रायणीनगर, नेहरू नगर, कासारवाडी, चिखली, मोशी, तळवडे, फुगेवाडी, चिंचवड, रावेत, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, थेरगाव, काळेवाडी आदी परिसरातील विविध ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड या तिन्ही विधानसभा संघातील भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष, विविध पदाधिकारी तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे.