मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोंडवे धावडे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Share

पुणे प्रतिनिधी (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोंडवे धावडे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सेवा कार्यातून वाढदिवस साजरा होणे हे निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. सेवा प्रेरणेतून घडलेला हा सेवा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

या उपक्रमासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजपाचे माजी अध्यक्ष सचिन मोरे, रूपेश घुले अभिजीत धावडे, संदीप पोकळे,भगवान गायकवाड, निखिल धावडे, सुभाष नाणेकर, बापूसाहेब पोकळे हे उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *