पुणे प्रतिनिधी :: जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांची तब्येत देखील खालावत आहे. मात्र, आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाबद्दल धक्कादायक दावे केले आहेत.
भाजपाला मराठ्याचे मते हवेत मात्र आरक्षण नकोय
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून देखील अन्नधान्य तांदूळ बिस्कीट बिसलरी बॉटल फरसाण चिवडा
असे अनेक खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना करण्यात आले, सुस माळुंगे पाषाण बाणेर भागातून, बिबवेवाडी कोंढवा धायरी, पर्वती अनेक गाड्या मुंबईला पाठवण्यात आल्या, यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा नागरिकांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला,
पुणे महानगरपालिकेला भाजपाला मत नाही
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेली टीका ही खूप टोकाची आहे संपूर्ण मराठा समाजाचा आव्हान दादांनी केलेला आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्ष मत नाही असे देखील मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
EWS आरक्षण हे खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे हे सामाजिक मागास नाहीत. ते त्यांच्या मालमत्तेचे शेतीचे तुकडे तुकडे करत दोन गुंटेवाले झाले आणि गरिब झाले. मुलांना त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण देता येईना. म्हणून त्यांना आरक्षण हवय. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.
तसेच, जात मागास ठरवण्याचे अधिकार घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगाला दिलेले आहेत, ते शिंदे समिती ठरवू शकत नाही. असे सांगत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे पाटील म्हणाले. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील असही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड
मराठा समाजाला गावचे सरपंच पद घ्यायचं आहे. एसइबीसी आणि ई डब्ल्यू एस मधून सर्व आरक्षण मिळाले होते. आता फक्त राजकीय आरक्षणाची धडपड सुरु आहे. येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडीटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
