Pune पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वादांमुळं राज्यभर चर्चेत आहेत. भाजपनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अमोल बालवाडकर यांना उमेदवारी नाकारल्यानं थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत उमेदवारी मिळवली.
भाजपनं या ठिकाणी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) यांनी पुणे महापालिका निवडणुकीची भविष्यवाणी केली आहे. मी आज भविष्यवाणी करतो की, महाराष्ट्रातील सर्वाधिक मत घेऊन नगरसेवक होईल तो लहू बालवडकर होईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.(Chandrakant Patil)
जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा भले भले मला विचारतात दादा (Chandrakant Patil) काय होईल. जेव्हा जेव्हा मी सांगितलं आहे ते खरं झालं आहे. २०१७ वेळी पण सांगितलं होतं मुंबईत ८२ जागा येईल आणि बरोबर तेवढ्याच जागा आल्यात. बालेवाडीमध्ये सुद्धा लहू बालवडकर सर्वाधिक मतांनी निवडून येईल हा माझा विश्वास आहे. लिहून ठेवा महाराष्ट्रात सर्वाधिक मताने लहू बालवडकर निवडून येईल अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
Chandrakant Patil: काय म्हणालेत चंद्रकांत पाटील?
लहू बालवडकर यांच्या प्रचारावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लहू बालवडकर यांचं ईव्हीएम मशीन वर चौथं नाव आलेलं आहे, परंतु महाराष्ट्रातली सर्वाधिक मतं मिळवण्याचा दावा ते करत आहेत. घोडा मैदान लांब नाहीये. बालवडकरच महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेतील. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा, मोठ्या-मोठ्या निवडणुका होतात. तेव्हा-तेव्हा, भले-भले लोक मला विचारतात दादा काय होईल? आणि मी केलेली भविष्यवाणी तेव्हा खरी ठरते, एकावेळी भारतीय जनता पार्टीचे फक्त 29 उमेदवार होते शिवसेनेचे 82 होते निवडणुका होत्या, देवेंद्रजी मला म्हणाले निवडणूक आता जवळ आली आहे, काय होईल, म्हटलं 82 ते म्हणाले शिवसेनेचे विचारत नाही. आपल्या किती येतील? आपल्या 29 आहेत, मी म्हटलं लिहून ठेवा 82 आणि त्यावेळी 82 जागा आल्या, त्यानंतर आज भविष्य वर्तवतो आहे, लिहून ठेवा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतं मिळवून नगरसेवक होईल तो लहू बालवडकर, अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.
