भाजप आमदाराचा मोठा दावा; संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध

Shivsena MLA Santosh Bangar : हिंगोलीमधील कळमनुरीचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतात. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली, अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तान्हाजी मुटकुळे आणि संतोष बांगर या सत्ताधारी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. भाजप आमदार मुटकुळे यांनी संतोष बांगर यांनी शिंदेंकडून ५० खोके घेतल्याच्या आरोप केला होता. आता त्यामध्ये आणखी भर पडली असून संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. जायभाये नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील निवडणुकामध्ये ‘ अवैध ‘ धंदे हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. विशेषत: वाळूच्या अवैध व्यावसायातील अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान आमदार संतोष बांगर यांच्या घरात १०० पोलिसांनी झडती घेतल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला. ‘हिंगोली आणि कळमनुरी येथे शिवसेनेची ताकद भक्कम आहे. त्यामुळेच विरोधकांची पायाखालची वाळू सरकू लागली असून असे छापे राजकीय दबावाखाली टाकले जात आहेत. आमदारांच्या घरी छापा टाकण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते, मात्र अशी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, असा दावा त्यांनी केला.