माण पंचायत समिती गणात सौ. युगंधरा पारखीचां संवाद आपुलकीचा; नागरिकांचा मिळतोय उस्फूर्त पाठिंबा
हिंजवडी प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुळशी तालुक्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच गट आणि गणांत उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे.
69 माण पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार युगंधरा नवनाथ पारखी यांनी डोअर टू डोअर नागरिकांच्या गाठीभेटी मोठा भर दिला आहे, महिला मंडळींकडून उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळत आहे, प्रत्येक संवादातून विश्वास, पाठिंबा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे.
या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि आपल्या भागाच्या विकासाबाबत चर्चा केली. माण पंचायत समिती गणातील नागरिकांचा, विशेषतः महिला व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पदयात्रेला लाभला. अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार युगंधरा नवनाथ पारखी यांना जाहीर पाठिंबा दिला.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
